पुणे: शहरातील सातारा रस्त्यावर डी-मार्टनजीक मध्यराञी 02 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली. दलाकडून 06 फायरगाड्या 02 वॉटर टँकर व 01 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या होत्या.
घटनास्थळी 3 दुकानांमधे मोठ्या प्रमाणात आग लागली होती. 1) दुकान होम अप्लायन्स 2) दुकान किचन अप्लायन्स व 3) दुकान मोबाईल शॉपी अशी दुकाने होती. घटनास्थळी गॅस शेगडी, चिमण्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही, मोबाईल, बॅटरी अशा अनेक प्रकारच्या वस्तु होत्या.
याठिकाणी आग लागून स्फोट झाल्याने दोन मजली इमारतीत मोठी पडझड झाली आहे. स्फोट इतके मोठे होते की, दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य पलीकडील रस्त्यावर पडले होते. एक दुचाकी पुर्ण जळाली आहे.
भीषण आगीत दोन नागरिक जखमी झाले असून यामधे एक इसम दुकानाचा मालक असल्याचे स्थानिकांकडून समजते. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणली असून धोका दूर केला आहे.