पुण्यातील मुळशी भागातील घोटावडे फाटा परिसरात असलेल्या एक नामांकित कंपनीला भीषण आग लागली आहे. घोटावडे फाट्याजवळ असलेल्या प्राज (Praj company fire) या कंपनीला आज सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनीत वापरण्यात येणाऱ्या रसायनांमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग अतिशय भीषण असल्यामुळे घटनास्थळी पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना वर्दी मिळताच रवाना झाल्या आहेत. या गाड्या घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या आतमध्ये कोणीही कर्मचारी अडकलेले नाहीत. मात्र तरीही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निशामक वाहनासह रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवानांकडून युद्ध पातळीवरती ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
