महामेट्रोकडून पुण्यात नवीन सात मार्ग प्रस्तावित, कोणते आहेत हे नवीन मार्ग ?

430 0

पुणे- पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने एल अॅण्ड टी कंपनीकडून तयार करून घेतलेल्या ‘ सर्वंकष वाहतूक आराखड्यात सुमारे १९५.२६ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेचे दोन आणि पीएमआरडीएने हाती घेतलेला एक अशा तीन मेट्रोमार्गांव्यतिरिक्त नव्याने सहा असे एकूण नऊ मार्गांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये आता महामेट्रोने ८२.५ किलोमीटर लांबीचे नव्याने सात मार्ग सुचवले आहेत.

या सात मार्गांचे अहवाल तयार करण्यास परवानगी देण्याची विनंती पीएमआरडीएकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. पीएमआरडीएने सात हजार २०० चौरस किलोमीटर हद्दीचा ‘ सर्वंकष वाहतूक आराखडा ‘ ( सीएमपी ) तयार करण्याचे काम ‘ एल अॅण्ड टी ‘ कंपनीला दिले आहे. या कंपनीने पहिल्या टप्प्यात दोन हजार चौरस किलोमीटर लांबीच्या परिसरातील वाहतुकीचा आराखडा तयार करून पीएमआरडीएला सादर केला आहे. तर वाहतूक सुरळीत आणि गतिमान करण्यासाठी सुमारे ६६ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत .

पुणे महापालिकेने पिंपरी – चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांचे काम हाती घेतले आहे. तर हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. सर्वकष वाहतूक आराखड्यात या मार्गांचे विस्तारीकरणाबरोबरच नव्याने सहा मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. हे मार्ग दोन टप्प्यांत उभारण्याचे नियोजन असून २०३८ पर्यंत ते पूर्ण करण्याची शिफारस या अहवाल करण्यात आली आहे.

महामेट्रोने पीएमआरडीएल पत्र पाठवून नवीन सात मेट्रो मार्ग प्रस्तावित केले असून त्यांचे सर्वेक्षण करण्यास परवानगी मागितली आहे पीएमआरडीएने हे पत्र एल अँड टी कंपनी ला पाठवले असून त्यांच्याकडून या मार्गाची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत या सातपैकी स्वारगेट ते हडपसर या मार्गाचे सर्वेक्षण यापूर्वीच झाले आहे. महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला एचसीएएमटी आर मार्गदेखील मेट्रो प्रकल्प राबविता येईल का याची चाचणी या निमित्ताने होणार असल्याचे सांगितले आहे.

असे आहेत महामेट्रोकडून प्रस्तावित केलेले पुण्यातील नवीन सात मार्ग

एल अॅण्ड टी कंपनीने सुचविलेले मार्ग

पहिला टप्पा ( एकूण लांबी कि.मी.मध्ये)

३३.६३ निगडी ते कात्रज
२५.९९ चांदणी चौक ते वाघोली
२३.३३ हिंजवडी ते शिवाजीनगर
११.१४ शिवाजीनगर ते हडपसर
३०.०८ हिंजवडी ते चाकण

दुसरा टप्पा

९ .०८ सिंहगड रस्ता- वीर बाजी पासलकर ते पुणे कॅटोन्मेंट
८.८७ वारजे ते स्वारगेट
३५.२३ वाघोली – पवार वस्ती ते हिंजवडी
१७.८१ चांदणी चौक ते हिंजवडी

महामेट्रोकडून नव्याने सुचविण्यात आलेले मार्ग

१.५ वनाज ते चांदणी चौक
१२ रामवाडी ते वाघोली
५ हडपसर ते खराडी
७ स्वारगेट ते हडपसर
१३ खडकवासला ते स्वारगेट
५ एसएनडीटी ते वारजे
३६ एमसीएमटीआर ( वर्तळाकार मार्ग )

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात स्कूल व्हॅनवर अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने हल्ला; धक्कादायक कारण आले समोर

Posted by - March 5, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने स्कूल व्हॅनच्या समोरील…

#VIDEO : पुण्यात विचित्र अपघात; सिमेंट काँक्रीटच्या ट्रक खाली सापडून तरुणाचा दुर्दैवी अंत

Posted by - March 27, 2023 0
पुणे : पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून एक दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील पुनावळे येथे एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात…

श्रीमंत दगडूशेठ मंदिरात रंगला किरणोत्सव सोहळा, बाप्पाला घडला ‘सूर्यकिरणांचा महाभिषेक’

Posted by - February 11, 2022 0
पुणे- धार्मिक कार्यक्रमांनी गणेशभक्तांतर्फे करण्यात येणा-या अभिषेक व पूजा-अर्चनेप्रमाणे शुक्रवारी दगडूशेठ गणपती बाप्पांना चक्क सूर्यनारायणाने सूर्यकिरणांनी महाभिषेक केला. गणपती बाप्पांना…

PUNE CRIME : पुण्यात थरार; जर्मन बेकरी जवळ पूर्व वैमानस्यातून गोळीबार

Posted by - November 25, 2022 0
पुणे : पुण्यातील जर्मन बेकरी परिसरात गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी दोन गटांमध्ये…

पिंपरीत अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन टेम्पोचालकाकडून अत्याचार(व्हिडिओ)

Posted by - March 28, 2022 0
पिंपरी- एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन तिच्यावर टँपो चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *