पुणे: श्रावणी सोमवार निमित्त दाम्पत्यांनी पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. या नुसार भरत मित्रमंडळाच्या वतीने ५१ दाम्पत्यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात येते.
उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते पुनीत बालन यांच्या हस्ते नारायण पेठ येथील शिवमंदिरात महाआरती करण्यात आली. यानंतर महाप्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी मा.बाळासाहेब दाभेकर, निरंजन दाभेकर, राजेंद्र बुट्टे पाटील, अनिल येनपुरे, राजेश येनपुरे, अंकुश काकडे, प्रमोद घाडगे, दत्ता सागरे, अॅड.मंदार जोशी, राजेंद्र पंडित यांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.