Murlidhar mohol

Pune News : पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात बॅनरबाजी; कष्टाळू कार्यकर्ता कोण?

561 0

पुणे : पुण्याचे (Pune News) माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात अज्ञातांकडून महापालिकेसमोर बॅनरबाजी करण्यात आली आहे. तुला महापौर केले, स्थाई समितीचे अध्यक्ष केले, पक्षाचे सरचिटणीस केले… तुला आणखीन काय पाहिजे अशा आशयाचा फ्लेक्स पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अज्ञातांकडून लावण्यात आला होता. यामुळे राजकीय वर्तुळातून मोठी खळबळ उडाली आहे.

फ्लेक्सवर भाजपचे कमळ हे चिन्ह देखील छापण्यात आले होते. हा फ्लेक्स भाजपमधील कोणी लावला की आणखी कोणी हे समजु शकलेले नाही. महापालिकेच्या सुरक्षारक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर हा फ्लेक्स काढण्यात आला. दरम्यान, बॅनरबाजीमुळे पुण्यातील भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. महापालिकेच्या जवळ मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले होते.

काय लिहिले आहे पोस्टरवर?
स्टैंडिंग दिली , महापौर केलं , सरचिटणीस पण दिलं, आता खासदारकी पण? आता बास झालं तुला नक्की पडणार —- कष्टाळू भाजप कार्यकर्ते.

मोहोळ यांनी प्रतिक्रिया देण्यास दिला नकार
मुरलीधर मोहोळ यांनी या पक्षांतर्गंत वादातून झालेल्या बॅनरबाजीवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik News : वाटलं खेळता खेळता बुडाला पण…; नाशिकमधील ‘त्या’ 4 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचा Video आला समोर

Chandrapur News : चंद्रपुर हळहळलं ! महिलेनं लेकीला विहिरीत ढकललं अन्…

Pune Crime News : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे कोयते-तलवारीने 10 ते 15 गुंडांकडून तिघांवर हल्ला

Pune News : पुण्यात नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विमानसेवा

Utkatasana : उत्कटासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!