जुन्नर तालुक्यात एकाच दिवशी बिबट्याचा चार जणांवर हल्ला

456 0

जुन्नर- जुन्नर तालुक्यात मंगळवारी एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 2 महिला आणि 2 पुरुष जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे या ठिकाणी एका यवकावर आणि जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव या ठिकाणी एका युवकावर बिबट्यांची हल्ला केला. खेड तालुक्यातील रेटवडी येथील महिलांच्या डोक्यात, तोंडावर बिबट्याने पंजा मारला आणि चावा घेतल्याने दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. अरुणा संजय भालेकर, रिजवना अब्दुल पठाण अशी या महिलांची नावे आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

या हल्ल्यात सर्वजण जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणी खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.उन्हाळा वाढत असल्यामुळे अन्न पाण्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Share This News
error: Content is protected !!