LATUR BAJRANG DAL NEWS : लातूर जिल्ह्यातील औसा शहरात शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसतोय… कारण बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून जनावरांच्या गाड्या अडवल्या जातायत, पोलीस स्टेशनला लावल्या जातायत आणि या सगळ्या गोंधळात भरडला जातोय तो बिचारा शेतकरी आणि व्यापारी.त्यामुळे तेथे जनावरांची खरेदी-विक्रीच बंद झालीय (LATUR BAJRANG DAL NEWS).
PUNIT BALAN GROUP: ‘बँड कला विकास प्रतिष्ठान’च्या वतीने पुनीत बालन यांचा सत्कार
लातूर जिल्ह्यातील औसा शहरात जनावरांचा पारंपरिक आठवडी बाजार भरतो. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून या बाजाराला अडथळा निर्माण झालाय. त्याचं कारण
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून पोलीस स्टेशनमध्ये लावल्या जात आहेत.या अडथळ्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतोय.आम्ही जनावरे विकायला आलोय. पण खरेदीदार घाबरतायत. बजरंग दलाचे लोक गाड्या थांबवतात, पोलिसात घेऊन जातात. जनावरं गोशाळेत टाकतात. पुन्हा आणताना खर्च येतो, मानहानी होते. आम्ही काय करायचं?” असा शेतकऱ्यांकडून विचारला जातोय..
जनावरांचा व्यापार बंद पडलाय. खरेदीदार येत नाहीत. शेतकरी विक्री करत नाहीत. आम्हाला तोटा होतोय. कायद्याने जनावरं विकत घेतो, तरी त्रास होतो.”बाजारात दिवसभर शेतकरी आणि व्यापारी बसले तरी व्यवहार होत नाहीत.”बजरंग दलाच्या भीतीने लोक खरेदीलाच येत नाहीत,” अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जातीये..
शेतकऱ्यांनी कर्ज फेडायचं, घरखर्च चालवायचा, मुलांचं शिक्षण करायचं – आणि त्यासाठी त्यांना जनावरांची विक्री करणं हा एक मार्ग असतो. पण बजरंग दलाच्या भूमिकेमुळे शेतकरी आणि व्यापारांची मोठी अडचण निर्माण झाली.
सरकार आणि पोलिस प्रशासनाने यात लक्ष घालून शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हक्काचं रक्षण करणं गरजेचं आहे.