पुणे : पुण्यामध्ये (Pune Police) सध्या महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण खूप वाढले आहे. या सगळ्यामुळे महिलांच्या सुरक्षततेसाठी पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त रितेश कुमार यांनी 89759 53100 व्हॉट्सॲप नंबर शेअर केला आहे. तुमच्या परिसरातील (Pune Police) महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना/अभिप्राय देण्यासाठी मेसेज करू शकता. त्यासोबतच इतर घटनांचा आढावा घेऊन पुढील कारवाई केली जाईल. जर कोणाला तातडीची गरज पडली तर तुम्ही 112 या क्रमांकावर संपर्क करू शकता.
