KUNDMALA RESCUE OPERATION: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी (दि. १५ जून) जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत ४ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

KUNDMALA RESCUE OPERATION: 51पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

197 0

KUNDMALA RESCUE OPERATION: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी (दि. १५ जून) जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत ४ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक पोलीस,

शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने

बचावकार्य केल्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले.

KUNDAMMA BRIDGE COLLAPSE: “फादर्स डे”च्या दिवशी इंद्रायणीत बाप लेक बुडाले; राज्यभरात हळहळ

घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी या ठिकाणी २५ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.

स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील जागेवर पोहोचून काही हायड्रा मशीन जागेवर मागवल्या.

सर्व पथकांनी ने एकत्रित येऊन काम चालू केले. स्थानिक नागरीकांनीही जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. या ठिकाणी किमान २५० स्वयंसेवक काम करत होते.

तळेगाव येतील ग्रामीण रुग्णालय, अथर्व हॉस्पिटल, पवना हॉस्पिटल, युनीक हॉस्पिटल, बडे हॉस्पिटल येथे जखमींना दाखल करण्यात आले आहे.

आज अखेर 35 जखमी रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले असून,

11 जखमी रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे प्रशासनातर्फे कळविले आहे.

अतिदक्षता उपचारांची गरज असलेल्या जखमींना तत्काळ आयसीयू मध्ये हलविण्यात आले.

आयसीयू मधील रुग्णांची काल रात्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात जावून विचारपूस केली व डॉक्टरांना योग्य ते उपचार करण्यासाठी सूचना दिल्या.

KUNDMELA BRIDGE COLAPSE: कुंडमळ्यात यापूर्वीही दुर्घटना; मागील 5 वर्षात काय घडलं?
कुंडमळा (KUNDMALA RESCUE OPERATION) येथील घटनास्थळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील,

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार सुनिल शेळके यांनी भेट देऊन माहिती घेतली व सर्व यंत्रणंना तात्काळ मदतीच्या सूचना दिल्या.

PUNE KUNDMALA BRIDGE: कुंडमळा पूल दुर्घटना: 38 जणांना वाचविण्यात यश
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे,

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी घटनास्थळी उपस्थित होते.

DEVENDRA FADNVIS ON KUNDMELA BRIDGE: दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी; मदत कार्याला तातडीने वेग
कालपासून आपत्ती निवारण कक्ष तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात आला आहे.

कोणत्याही पर्यटकाची हरवल्याबाबत तक्रार आज सांयकाळ पर्यंत प्राप्त झालेली नाही.

त्यामुळे शेवटी आज सायंकाळी 6 वाजता बचावकार्य थांबविले असल्याची माहिती मावळचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली आहे

यावेळी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, बापू बांगर, तहसीलदार विक्रम देशमुख,

नायब तहसीलदार गणेश तळेकर, अविनाश पिसाळ, पोलीस निरीक्षक रणजित जाधव आदी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!