KUNDESHWAR PAPALWADI NEWS: खेड तालुक्यातील महिला भाविकांना घेऊन कुंडेश्वर महादेवाच्या दर्शनाला (KUNDESHWAR PAPALWADI NEWS) निघालेल्या पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला.

KUNDESHWAR PAPALWADI NEWS: श्रावणी सोमवारचा उपवास, विठ्ठलाची भजनं, “तो” शेवटचा व्हिडिओ अन् क्षणात आक्रोश; खेडमधील अपघाताची A टू Z स्टोरी

106 0

KUNDESHWAR PAPALWADI NEWS: खेड तालुक्यातील महिला भाविकांना घेऊन कुंडेश्वर महादेवाच्या दर्शनाला (KUNDESHWAR PAPALWADI NEWS)

निघालेल्या पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला.

यामधील मृतांची संख्या आता दहावर जाऊन पोहोचलीये.

उभ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरवणारा हा अपघात नेमका कसा घडला याचीच ही ए टू झेड स्टोरी.‌..

तत्पूर्वी पाहूया अपघात होण्याच्या अगदी काही मिनिट पूर्वीचा डोळ्यात पाणी आणणारा हा व्हिडिओ..

KUNDESHWAR PAPALWADI NEWS: खेडच्या पाईटमधील घाटात अपघात नेमका कसा झाला ?
राब राब राबून कष्टानं संसार फुलवलेल्या पापळवाडी गावातील माय माऊल्यांनी फावल्या वेळेत सुरू केलेला काळुबाई महिला बचत गट..

याच बचत गटाच्या माध्यमातून श्रावणी सोमवाराच्या निमित्तानं कुंडेश्वर महादेवाच्या दर्शनाला जायचं ठरवलं.

यासाठी विशेष म्हणजे आठवडाभरापूर्वीच या महिलांनी एकसारख्या पांढऱ्या रंगाच्या साड्याही घेतल्या.

जवळपास अर्धा- पाऊण तासाचा प्रवास असल्याने पीकअप गाडी ठरवली.

या गाडीत बसून 35 महिला आणि दोन लहान मुलं या देवदर्शनाला निघाले.

वाटेत वारीला जाताना असतो अगदी तशाच पद्धतीचा उत्साह आणि आनंद महिलांच्या चेहऱ्यावर होता.

विठ्ठलाचं नामस्मरण करत, अभंग- भजनं गात कुंडेश्वरच्या दिशेने प्रवास सुरू होता. त्याचवेळी वाटेत घाट रस्ता लागला.

घाटाच्या कड्यांवर कठडे नव्हते, त्यामुळे पहिलाच वळणावर पिक अप चालकाचं नियंत्रण सुटलं

आणि 25 फुटांपेक्षा जास्त खोल असलेल्या दरीत ही गाडी कोसळली. पाच- सात पलट्या मारत गाडी खाली आदळली.

आनंदात सुरू असलेल्या भजनांवर विरजण पडलं. महिलांचा, लहान मुलांचा आक्रोश सुरू झाला.

SNEHA ZENDAGE BHARATI VIDYAPEETH POLICE: वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; 20 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्यानं विवाहितेची आत्महत्या

विशेष म्हणजे अशा परिस्थितीतही चालकाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वेळीच बाहेर उडी मारली.

मात्र सात महिलांचा जागीच मृत्यू झाला.

पुढच्या काही वेळात आणि उपचारादरम्यान आणखी तीन महिलांना जीव गमवावा लागला.

इतर वीस ते पंचवीस महिला जखमी झाल्या.

Nashik fertilizer scam: शेतकऱ्यांना विकली जात होती भेसळयुक्त खतं नाशिकमध्ये विक्रेत्यांवर मोठी कारवाई!

स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणांकडून तातडीने या

महिलांना उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. या अपघाताची दखल सरकारने तातडीने घेतली.

मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांचं अर्थसहाय्य तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली.

जखमींना तातडीने आणि चांगल्या रुग्णालयात उपचार मिळावेत या दृष्टीनं प्रशासनाने नियोजन केलं.

तर दुसरीकडे ही बातमी गावात पोहोचताच संपूर्ण गावावर शोककाळा पसरली.

दिवसभर गाव बंद ठेवण्यात आलं तर गावातील घरांमध्ये चुलीही पेटल्या नाहीत.

आपली आई, आजी, बहीण, पत्नी, मावशी, काकू जशा आनंदात आणि उत्साहात महादेवाच्या दर्शनाला गेल्या होत्या

तशाच मनोभावे दर्शन घेऊन परत येतील, अशी आस लावून बसलेल्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

संध्याकाळी पाच ते सहा रुग्णवाहिकांमधून या महिलांचे मृतदेह पापळवाडीत पोहचवण्यात आले.

तर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात सर्व मृतांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

ROHIT PAWAR VS PADALKAR ON SHANRANU HANDE: पडळकर यांच्या कार्यकर्त्याच फिल्मी स्टाईल अपहरण; रोहित पवार गोपीचंद पडळकर आमने-सामने
या भीषण अपघातानंतर पिकअप चालक हृषीकेश करंडे याला ताब्यात देण्यात आलं आहे.

ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या वळणावर कठडा नसल्याची माहिती समोर आली आहे.

घाटाच्या पहिल्याच वळणावर चालकाने चुकीचा गिअर टाकला ज्यामुळे गाडी रिव्हर्स आली

आणि थेट दरीत कोसळली.

त्यामुळेच या अपघातात सर्वात जास्त दोषी असलेल्या या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या वाहनात ज्येष्ठ महिला, लहान मुलं आहेत हे ठाऊक असतानाही त्याने निष्काळशीपणे वाहन चालवलं.

त्यामुळेच चालकाला कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!