Kondhwa News

Kondhwa News : कोंढवा खुर्द येथील प्रसूतीगृह सुरू न केल्यास आपने दिला आंदोलनाचा इशारा

371 0

पुणे : मागील वर्षी मोठा गाजावाजा व खर्च करून माँ खादिजा प्रसूतीगृह सुरू करण्यात (Kondhwa News) आले. परंतु आज अखेर तिथे प्रसूतीगृहाच्या कोणत्याही सोयी सुविधा नाहीत. सदरच्या जागी मोठी बिल्डिंग बांधली असून फर्निचर ही नव्याने दिले आहे. या परिसरामध्ये मोठ्या संख्येने नागरिक राहत असून त्यांना महिलांना घेऊन तपासणी व इतर सर्वच बाबींसाठी कोंढवा बुद्रुक येथे जावे लागते. त्यामुळे आम आदमी पार्टीने हे प्रसुतिगृह तातडीने सुरू करावे अशी मागणी महानगरपालिकेकडे केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा एम अली सय्यद यांनी दिला आहे.

या प्रसुतीगृहाच्या संकल्पना बाबत स्थानिक नगरसेविका परवीन शेख यांचे नावे चमकोगिरी करणारा मोठा बोर्ड लावलेला असून प्रत्यक्षात मात्र वरचा मजला पूर्णपणे बंद असून दरवाजांना कुलुपे लावलेली आहेत.

सदरच्या जागी चे प्रसूतीगृह तातडीने सुरू करावे व त्यासाठी योग्य त्या वैद्यकीय प्रशिक्षित स्टाफची नेमणूक करावी असे निवेदन आम आदमी पार्टी तर्फे आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांना दिले आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत, एम अली सय्यद, सतिश यादव, संजय रणधीर, मिलींद सरोदे, मोईन मडकी, नितीन कांबळे, रौफ शेख आदी उपस्थीत होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी काय अधिक फायदेशीर? ग्रीन टी की ब्लॅक टी?

Shreyas Talpade : हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातून सावरल्यानंतर श्रेयस तळपदेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Nanded Crime News : ट्रॅक्टर कालव्यात पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News : महायुती’तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर होणार मेळावे

Pune Crime News : पुणे हळहळलं ! जन्मदात्या बापानेच मुलीला संपवलं

Savitribai Phule : विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी

Chhatrapati Sambhaji Nagar : माताच बनली वैरी ! 8 महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आईने काढला पळ

Accident Video : कारचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; Video आला समोर

Kamal Pardeshi : अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन

Road Accident : भरधाव बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू

Shirdi News : पवारांच्या कार्यक्रमावरुन परतताना काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!