ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचं वयाच्या 89 व्या वर्षी काल रात्री दहाच्या सुमारास चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयांमध्ये दुःखद निधन झालं. साखरे महाराजांचे प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
आळंदी येथे मंगळवारी (ता. 21) दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. साखरे महाराज यांची प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.