पुणे: पुणे शहरात व धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत पडल्यामुळे खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गेल्या 24 तासात14.11 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
एकूण पाणीसाठा आता 09.08 टीएमसी इतका झाला असून खडकवासला धरणातून 4807 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
खडकवासला प्रकल्पात खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर ही चार धरणे येतात. या सर्व धरणांची मिळून एकूण पाणी साठवण क्षमता ही २९.१५ टीएमसी इतकी आहे. वरसगाव साठवण क्षमता १२.८२ टीएमसी, पानशेत धरणाची एकूण साठवण क्षमता १०.६५ टीएमसी, टेमघर धरणाची पाणी साठवण क्षमता ३.७१ टीएमसी आणि खडकवासला धरणाची पाणी साठवण क्षमता ४.६५ टीएमसी इतकी आहे.