Khadakwasla Dam

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट; पालिका आयुक्यांनी दिले ‘हे’ आदेश

418 0

पुणे : सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकीकडे उकाडा वाढत आहे तर दुसरीकडे धरणातील पाणीसाठा (Khadakwasla Dam) संपत चालला आहे. पुण्यातील खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.पाणीसाठ्यात घट झाल्याने पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत उन्हाळ्यातील पाणीवाटपाचं नियोजन करण्यात आले. तशा सूचनादेखील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

पालिकेने दिला इशारा
पिण्याचे पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरण्यास नेहमीच बंदी घालण्यात आली आहे. तथापि, पिण्याच्या पाण्याचा वापर करू नका, त्याऐवजी बोअरवेल किंवा एसटीपी सारख्या पर्यायांचा वापर करा, असे पुन्हा सर्वांना बजावले आहे. शिवाय, येत्या दोन-तीन दिवसांत आम्ही सर्व नियमांचे उल्लंघन करून पिण्याचे पाणी कोण वापरत आहे हे पाहण्यासाठी सर्वेक्षण करणार आहोत. त्यात कोणी दोषी आढळल्यास पालिकेकडून संबंधितांना नोटिस पाठवण्यात येईल आणि दंड ठोठावला जाईल, असं पालिकेने म्हटलं आहे.

कोणत्या विभागात किती पाणीसाठा?
राज्यातील सहा विभागांमध्ये आज 36.71 टक्के पाणीसाठा आहे. 14,862 दलघमी पाणी शिल्लक आहे. नाशिक विभागात 37.54 पाणीसाठा उपलब्ध आहे तर पुणे विभागात 720 धरणांचा पाणीसाठी 35.30 टक्के इतका झाला आहे. नागपुर विभागात 48.24 टक्क्यांवर गेला असून अमरावती विभागात 48.62 टक्के पाणी शिल्लक आहे. मराठवाड्यात औरंगाबाद विभागात 920 धरणांमध्ये केवळ 18.90 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vanchit Bahujan Aghadi : वंचित कडून कॉँग्रेसच्या बंडखोराला पाठिंबा; ‘या’ मतदारसंघात वंचितचा मोठा निर्णय

Loksabha : लोकसभेत सर्वाधिक वेळा निवडून आलेले खासदार कोण?

Pune News : क्रेनचा हूक तुटल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Vaishali Darekar : चर्चेतील चेहरा : वैशाली दरेकर

Navneet Kaur Rana : अखेर नवनीत राणांना दिलासा; जात प्रमाणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Bharati Pawar : चर्चेतील चेहरा : भारती पवार

Congress : लोकसभेच्या तोंडावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Loksabha : अजितदादांची मोठी खेळी; अखेर ‘तो’ बडा नेता लागला हाती

Sanjay Nirupam : निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Purvottanasana : पूर्वोतानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!