Khadakwasla Dam

खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू; सतर्क राहण्याच्या पाटबंधारे विभागाच्या सूचना

409 0

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामूळे पुणे शहरातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यानुसार खडकवासला धरणातील दरवाजे उघडण्यात आले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. सकाळी सात वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला पाटबंधारे विभागाकडून नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 4708क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी 07:00 वा. 9416 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!