कात्रज डेअरीच्या अध्यक्षपदी केशर पवार तर उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर बिनविरोध

365 0

पुणे- पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची सन 2022-2027 च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी महिला राखीव मतदार संघातून निवड झालेल्या केशर पवार यांची तर उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणुक निर्णय अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक मिलिंद सोबले यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. नवनिर्वाचित अध्यक्ष केशर पवार १९९८ पासून संघावर संचालक म्हणून काम करत आहेत. 2014 ते 2015 या कालावधीत त्या संघाच्या उपाध्यक्षाही राहिलेल्या आहेत. तर राहुल दिवेकर हे प्रथमच संघाच्या संचालक मंडळावर निवडून आले आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!