कात्रज जुन्या बोगद्याजवळ दरड कोसळली; कोणतीही जीवितहानी नाही

310 0

पुणे: पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसानं रौद्ररूप धारण केलं असून या मुसळधार पाऊसामुळे बुधवारी दुपारच्या वेळी कात्रज जुन्या बोगद्याजवळ दरड कोसळली.

त्यामुळे काहीकाळ कात्रज घाटात वाहतूक खोळंबली होती.मागील 15 दिवसांत कात्रज घाटात दरड कोसळण्याची ही तिसरी घटना घडली आहे.या कात्रज घाट रस्त्याला राज्य विशेष महामार्गाचा दर्जा आहे.

देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग यांच्याकडे आहे. मात्र, देखभाल दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे कारण सांगून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच अशा घटना वारंवार घडताना दिसून येत आहे. यावर तातडीने उपाययोजना आखाव्या, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

Share This News
error: Content is protected !!