Junner Crime News : पुणे जिल्ह्यातल्या धबधब्याच्या परिसरात अढळते पांढऱ्या रंगाची गाडी… जवळच असणाऱ्या दरीच्या कठड्यावर एका स्त्री आणि पुरुषाच्या चपलाची जोड… दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून एक मुलगी आणि एक तलाठी बेपत्ता असल्याची फिर्याद… एक पुरुष आणि मुलीचा मृतदेह पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातील दरीत सापडतो… या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. नक्की काय आहे हे प्रकरण? कोणाचे आहेत हे मृतदेह? चला जाणून घेऊया….
Sagar Bhingardive Bail Parade : रेखा जरे हत्याकांडातील आरोपीची समर्थकांकडून मिरवणूक
जुन्नर येथील रिव्हर्स वॉटर फॉल जवळ एक पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे तिथल्या स्थानिकांच्या लक्षात आलं. ही कार एकाच जागी थांबून होती त्यानंतर थोडी आसपास शोधा शोध केली असता दरीच्या कठड्याच्या टोकावर एका स्त्री आणि पुरुषाच्या चपला दिसून आल्या. नंतर ग्रामस्थांनी याबाबतची माहिती पोलिसांमध्ये दिली. रविवारी पुणे जिल्ह्यात पाऊस सुरू असल्यामुळे दाट धुकं आणि अंधारामुळे शोध कार्य थांबवण्यात आला होतं. सोमवारी 23 तारखेला सकाळी रेस्क्यू टीमनं दरीमध्ये उतरून सर्वत्र शोध घेतला आणि त्यानंतर एक स्त्री आणि एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला हे मृतदेह (Junner Crime News) बाहेर काढण्यात आले.
पोलिसांनी तपास केल्यानंतर मृतदेहांची ओळख पटवण्यात आली. यामध्ये अहिल्यानगर तालुक्यातील श्रीगोंदा येथील रामचंद्र साहेबराव पारधी वय 40 वर्ष तर दुसरा मृतदेह रूपाली संतोष खुटाण ता. जुन्नर ही मुलगी अल्पवयीन असल्याचे बोलले जातय.
पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार रामचंद्र पारधी हे मूळचे जुन्नर तालुक्यातीलच दुर्गावाडी येथील असून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ते तलाठी म्हणून कार्यरत होते. मात्र मागच्या काही दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने अहिल्यानगर तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तर दुसरीकडे रुपाली देखील काही दिवसांपासून बेपत्ता होती आणि तिच्या कुटुंबीयांनी जुन्नर पोलिसांना अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
घटनास्थळी आढळल्या दोन स्वतंत्र सुसाइड नोट (Junner Crime News)
पोलिसांना तपास करत असताना घटनास्थळी दोन स्वतंत्र सुसाइड नोट आढळल्या. रामचंद्र पारधी यांनी आपल्या आई-वडील व भावाची माफी मागून पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. पत्नी आणि तिच्या नातेवाईकांविरोधात कायदेशीर कारवाई करा, असे रामचंद्र पारधी यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे.
रुपाली खुटाण हिने सुद्धा आपल्या आईवडिलांकडून होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. या दोघांनी कुटुंबियांवर गंभीर आरोप करत एकत्रित आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, दोघांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारे गुन्ह्याची नोंद करत कारवाई सुरू केली आहे.
आता एकीकडे रामचंद्र यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल केला होता. तर दुसरीकडे रुपालीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय दरीच्या कठड्यावर त्या दोघांचे चप्पल सापडणे, रिव्हर्स वॉटरफॉल जवळ पांढरी कार सापडणं म्हणजेच हे दोघे एकमेकांना आधीपासून ओळखत होते, ज्या आर्थी त्यांचे चप्पल दरीच्या कठड्यावर सापडले त्या अर्थी त्या दोघांनी मिळून आत्महत्या केली असेल, असं काय घडलं की त्यांनी असं टोकाचं पाऊल उचललं? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.