JAIN BORDING LAND SALE SUSPENSION: पुण्यातील शिवाजीनगर येथील ऐतिहासिक जैन बोर्डिंग (JAIN BORDIN) हाऊसच्या जागा विक्रीविरोधात उभ्या राहिलेल्या लढ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई येथे धर्मादाय आयुक्तालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली असून आता यात जमिनी विक्री व्यवहाराला स्थगिती देण्यात आली आहे
Satara News : धुलीवंदनाच्या दिवशी महाबळेश्वरमध्ये मोठा अपघात; टेम्पो 400 फूट दरीत कोसळला
जैन ट्रस्टच्या बोर्डिंगमधील जैन मंदिरालाच गहाण ठेवून कर्नाटकातील बीरेश्वर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक या दोन संस्थांकडून बिल्डरच्या नावे कर्ज मंजूर करण्यात आले असल्याची बाब समोर आली होती. यानंतर जैन समाजाच्या संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत धर्मदाय आयुक्तांकडे धाव घेतली.
जैन बोर्डिंग हाऊसच्या वतीने याचिकाकर्ते ॲड. योगेश पांडे यांनी बाजू मांडल्यानंतर धर्मदाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.