ISIS TERRORIST ARREST: पुण्यातील कोंढवा, वानवडीतील दहशतवाद्यांना इंडोनेशियामधून अटक; दहशतवादी हल्ल्यांचा कट उधळला ?

1632 0

राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुणे आयएसआयएस मॉडेल प्रकरणातील दोन दहशतवाद्यांना ISIS TERRORIST ARREST इंडोनेशियातून अटक केली आहे.

विशेष म्हणजे हे दोन्ही दहशतवादी पुण्यातील कोंढवा आणि वानवडी परिसरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते.

ISIS TERRORIST ARREST: ABDUL SHAIKH, TALHA LIYAKAT KHAN या दहशतवाद्यांना NIA कडून अटक
अब्दुल्ला फैयाज शेख ऊर्फ ‘दियापरवाला’ आणि तल्हा लियाकत खान अशी या दोन्ही दहशतवाद्यांची नावे असून त्यांना इंडोनेशिया मधून अटक करण्यात आली आहे. ISIS TERRORIST ARREST

तसेच त्यांना नुकतंच मुंबईत आणण्यात आलंय. अब्दुल्ला फैयाज शेख ऊर्फ ‘दियापरवाला’ हा मुळचा पुण्याच्या कोंढव्यातील मिठानगर येथील रहिवासी होता. तर तल्हा लियाकत खान हा तिथूनच काही अंतरावर असलेल्या वानवडी परिसरात वास्तव्यास होता.

या दोघांच्या गैर कृत्यांची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणांना मिळाली होती. तेव्हापासून हे दोघेही फरार होते.

NIA च्या माहितीनुसार, हे दोन्ही दहशतवादी स्फोटक तयार करण्याच्या कार्यशाळा आयोजित करायचे, तसेच दहशतवादी हल्ल्यादरम्यान लपण्यासाठी जंगलात ठिकाण शोधणं, निर्जन स्थळी फायरिंग चे प्रॅक्टिस करणं, आणि दरोडे टाकून दहशतवादी कारवायांसाठी पैसे गोळा करणं, अशा अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी होते.

त्यामुळेच तपास यंत्रणा त्यांच्या मागावर होत्या.

त्यांच्या अटकेसाठी NIAनं प्रत्येकी 3 लाख रुपयांचंही बक्षीस जाहीर केलं होतं. दरम्यान नुकतंच या दोघांना इंडोनेशियातून अटक करून भारतात आणण्यात आलंय.

लवकरच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.पुण्याच्या विविध भागांमध्ये दहशतवाद्यांना मदत करणारे किंवा दहशतवादी तयार करणारे अनेक तरुण याआधीही सापडलेल्या आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर या दोघांचाही तपास सुरू होता मात्र अखेर या दोघांना अटक करण्यात आली आहे.

देशातील महाराष्ट्र गुजरात आणि इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचे कट असणाऱ्या आयएसआयएसचा मोठा कट या अटकेमुळे उधळून लावण्यात तपास यंत्रणांना यश आलंय.

मात्र या दोघांचाही मुख्य म्होरक्या कोण आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत.

SANJAY SHIRSAT ON BARTY Researcher: 2018 पीएचडी 214 संशोधक विद्यार्थ्यांना यूजीसी नियमानुसार एकूण पाच वर्ष फेलोशिप देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाला तातडीने आदेश

PUNE POLICE LAND SCAM: वाघोली जमीन घोटाळा प्रकरण, पोलीस निरीक्षकासह चार जणांवर गुन्हा दाखल

GAJA MARNE MUTTON PARTY: गुंड गजा मारणेची पोलिसांसमोरच मटन पार्टी; VIP TREATMENT दिल्याचं उघड

PUNE CRIME NEWS: गर्लफ्रेंडकडून लग्नास नकार अन् बॉयफ्रेंडने केले ‘ते’ व्हिडिओ व्हायरल; पाहा संपूर्ण प्रकरण काय?

Share This News
error: Content is protected !!