IRAN FLEX FLAGS AT LONI KALBHOR PUNE: पुण्यात इराणचे झेंडे आणि फ्लेक्स कोणी लावले ?

90 0

IRAN FLEX FLAGS AT LONI KALBHOR PUNE:  इराण आणि इस्राइल देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद देशभरात पडले होते. आता या युद्धाला युद्धविराम लागला असला तरीही हा वाद अजून आटोक्यात आलेला नाही. त्यातच पुण्यात चक्क इराणचे झेंडे आणि तिथले राजकारणी व धर्मगुरू अयातुल्लाह खामेनेई यांचे फ्लेक्स झळकले. इराणच्या समर्थनार्थ हे फ्लेक्स नेमके कोणी लावले ? आणि पोलिसांकडून कशा पद्धतीने कारवाई सुरू आहे पाहूया…

हिंदी भाषा संदर्भातील जीआर मागे; ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द

पुण्यात रविवारी दुपारच्या सुमारास इराणचे झेंडे आणि खामेनेई यांचे पोस्टर लावण्यात आल्याने खळबळ उडाली. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन परिसरात इराण देशाचे झेंडे आणि खामेनेई यांचे बॅनर लावण्यात आले होते. त्याचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि 24 तासांच्या आत हे झेंडे आणि फ्लेक्स उतरवण्यात आले. मात्र हे झेंडे आणि फ्लेक्स (IRAN FLEX FLAGS AT LONI KALBHOR PUNE )पुण्यात का लागले असा प्रश्न सर्वसामान्यांसह पोलिसांनाही पडला आहे. तसं पाहायला गेल्यास कश्मीर खोऱ्यातील भारतीय मुस्लिम आणि इराणमधील नागरिकांचे जवळचे संबंध आहे. भारत आणि इराण या देशांमधील अंतर्गत संबंधही चांगले असून खामेनेईंचं भारताशी जवळजवळ नातं आहे. खामेनेईंचे पणजोबा हे उत्तर प्रदेशमधील होते. सय्यद अहमद मुसावी यांचा जन्म बाराबंकी जवळच्या किंतूर गावात झाला होता. मुसावी हे १८३० मध्ये किंतूरहून इराणला गेले आणि तिथेच स्थायीक झाले. त्यांचे पणतू खामेनेई असल्यामुळे त्यांच्याबद्दल भारतीय मुस्लिमांना आदर आहे. यामुळे इराणध्ये काही घडलं की काश्मीर खोऱ्यात काही समुदायाचे लोक आंदोलनं करतात. मात्र त्याचे थेट पडसाद पहिल्यांदाच पुण्यात उमटलेले पाहायला मिळाले. त्यामुळेच अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून पोलिसांनी तात्काळ हे फ्लेक्स आणि झेंडे काढून टाकले.

TOP NEWS MARATHI : विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘कम ऑन किल मी’ म्हणत सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

लोणी काळभोर परिसरात हे फ्लेक्स आणि झेंडे नेमके कोणी लावले होते ? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे. मात्र इराणचे झेंडे पुण्यात का असा प्रश्न सर्वसामान्य पुणेकर उपस्थित करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!