पुण्यात नदीपात्रात अडकला जलपर्णीचा ढीग

263 0

पुणे: जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची निविदा काढण्यात आली होती मात्रखडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग वाढवून ११ हजार ९०० क्युसेक करण्यात येत आहे. पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आली.

पाण्यात जलपर्णीचा ढीग साचल्याने पाणी वाहण्यास अडथळा निर्माण झाला. जलपर्णी काढण्याचं काम महापालिकेकडून करण्यात येत आहे.

जेसीबीच्या मदतीने जलपर्णी काढण्याचं काम सुरू आहे. भिडे पुलाखाली जलपर्णी अडकली त्यामुळे तिथून पाणी पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला.

Share This News
error: Content is protected !!