Mumbai Pune Highway

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

361 0

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Expressway) वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सलग सुट्ट्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. शनिवार, रविवार आणि मंगळवारी गुढीपाडवा अशा सलग सुट्ट्यांमुळे मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

काय घेतला निर्णय ?
वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांना सकाळी बंदी घालण्यात आली आहे. आजपासून एक्स्प्रेस वे वर अवजड वाहनांना बंदी असणार आहे.7 एप्रिल पासून ते 9 एप्रिल पर्यंत सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत अवजड वाहनांच्या वाहतुकीला एक्स्प्रेस वे वर बंदी घालण्यात आली आहे. सलग सुट्ट्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!