पुणे: आज अनंत चतुर्दशी अर्थात गणरायाची विसर्जन मिरवणूक 7 सप्टेंबर पासून सुरू झालेला गणेशोत्सवाचे आज सांगता झाली. पुण्यामध्ये तब्बल 12 तासाहून अधिक वेळ सुरू असणारी विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच असून भाविकांचा मोठा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय.
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन मोठ्या दिमाखात पार पडला.
मानाचा पहिला श्री कसबा गणपतीचा दुपारी 4 वाजून 32 मिनिटांनी विसर्जन झालं मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणरायाचं 5 वाजून 37 मिनिटांनी विसर्जन झालं तर गुरुजी तालीम गणपतीचा सात वाजता तुळशीबाग गणपतीचं साडेसात वाजता तर केसरी वाडा गणपतीच 7 वाजून 45 मिनिटांनी विसर्जन झालं
तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं रात्री नऊ वाजता विसर्जन झालं