पुणेकरांनो सावधान! पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

743 0

पुणे:दोन दिवासांपूर्वी पुण्यात दोन तास मुसळधार पाऊस पडला होता. या पावसाने पुण्यातील मध्यवर्ती परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. अनेक गाड्यादेखील वाहून गेल्या होत्या.

दोन तास झालेल्या पावसाने पुण्यातील रस्त्यांना नाल्याचं स्वरुप आलं होतं. वनाज, जंगली महाराज रोडवर प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पुण्यात पुढील काही दिवस मोठ्या प्रमाणात वादळी पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. आज परत पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागात ढगफुटी झाली आहे.

पुण्यात सारसबाग, स्वारगेट , कात्रज ,बिबवेवाडी
कर्वेनगर , जांभूळवाडी, आनंद नगर ,माणिक बाग, औंध व काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे.

तर दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्याची तारांबळ उडाली आहे.त्यात पुणेकरांची दिवाळी काही प्रमाणात पावसात जाण्याची शक्यता आहे. पुण्यात 19 ऑक्टोबरपर्यंत वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, असे हवामान विभाग म्हणाले आहे.

Share This News
error: Content is protected !!