पुण्याच्या इंदापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून बावडा गावच्या यात्रेच्या वर्गणीवरून डॉक्टरांना मारहाण करण्यात आली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू उदयसिंह पाटील हे मारहाण करताना या व्हिडिओ दिसत आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
गावातील भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने यात्रा कमिटीतील काही लोक वर्गणी मागण्याकरिता बावडा गावातील डॉक्टर भागवत जाधव यांच्या खाजगी रुग्णालयात गेले होते या ठिकाणी त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. आणि याच दरम्यान उदयसिंह उर्फ भैय्यासाहेब पाटील यांनी डॉक्टरांना लागोपाठ तीन कांचीला लगावल्या 29 एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान हा प्रकार घडला असून नेमकी ही मारहाण का झाली डॉक्टरांनी यात्रा कमिटी यांच्या काही वाद झाले का याचं कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आलं नाही. याशिवाय या प्रकरणी इंदापूर पोलिसात अजून कोणताही गुन्हा दाखल झाला नाही
JAYANT PATIL यांच्याकडे… ; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष SUNIL TATKARE यांचं मोठं विधान
REELSTAR VICKY PATIL CASE: रील स्टार विकी पाटीलला वडलांनीच का संपवलं ? कारण आलं समोर