पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. या विरोधात पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेसने आज पिंपरी चिंचवड महानगपालिका भवनावर हंडा मोर्चा काढला.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असताना देखील दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जातोय, त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर महिला काँगेसने आंदोलनाचा बडगा उगारला आहे. यावेळी सत्ताधारी भाजप विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.