प्रभाग 24 मध्ये गणेश बिडकरांना वाढता पाठिंबा! मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश 

71 0

पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल हा राजकीयदृष्ट्या अधिकच महत्त्वाचा ठरत असून, येथे भारतीय जनता पक्षाला मिळणारा समर्थनाचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

गेला अनेक वर्षांमध्ये गणेश बिडकर यांनी सातत्याने प्रभागात केलेल्या विकास कामांमुळे सर्वच स्तरातून त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा वाढत आहे. आज प्रवेश केलेल्यांमध्ये मनसेचे उपविभाग प्रमुख रवी उर्फ बंडू भोसले, शाखा अध्यक्ष प्रशांत गायकवाड तसेच प्रीतम गायकवाड, योगेश पाष्टे, अजय चव्हाण, संतोष टिळेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या प्रवेशांमुळे प्रभागातील राजकीय समीकरणे भाजपच्या बाजूने अधिकच झुकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

मनसेत कार्यरत असतानाच रवी उर्फ बंडू भोसले हे वीरचक्र मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय राहिले आहेत. विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन, युवकांचे संघटन आणि थेट नागरिक संपर्क हे त्यांच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य राहिले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे गणेश बिडकर यांना मिळणारा स्थानिक पाठिंबा वाढताना दिसत आहे.

“गणेश बिडकर यांनी प्रभागात केलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. कमला नेहरू आणि केईएम हॉस्पिटलसारख्या महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या सुविधांमुळे सामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचार सहज मिळू लागले आहेत. ‘लाईट हाऊस’सारख्या उपक्रमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे. हे सर्व प्रत्यक्ष काम पाहता, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी गणेश बिडकर हेच योग्य नेतृत्व आहेत”, अशी भावना प्रवेशावेळी रवी उर्फ बंडू भोसले यांनी व्यक्त केली.

Share This News
error: Content is protected !!