GRINDER GAY DATING APP: गे डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या तरुणाला भेटायला जाणं, एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय.
या तरुणाचा अश्लील व्हिडिओ काढून जबरदस्तीने लुटल्याची घटना पुण्यात घडली आहे.
हा सर्व प्रकार ग्राइंडर या डेटिंग ॲपमुळे (GRINDER GAY DATING APP) घडलाय.
WARJE POLICE ROBBERY: वारजे पोलिसांनी दरोडेखोरांना पकडलं रंगेहाथ; व्हिडिओ व्हायरल
ही घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडली आहे. पीडित तरुणाची ग्राइंडर या गे डेटिंग ॲपवर एका अनोळखी तरुणाशी ओळख झाली.
दोघांमध्ये चॅटिंग सुरू झालं. दरम्यान आरोपी तरुणाने पीडित तरुणाचा विश्वास संपादन केला.
व त्याला भेटायला बोलावलं. आरोपीवर विश्वास ठेवून हा तरुण भेटायला गेला. त्यावेळी आरोपीने त्याला कार मध्ये बसून अज्ञात ठिकाणी नेलं.
PUNE ACCIDENT: टँकरच्या चाकाखाली चिरडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; पुणे शहरात एकच खळबळ
तिथे नेऊन त्याच्याबरोबर अश्लील कृत्य केलं. त्याच्यावर दबाव टाकून अश्लील व्हिडिओ शूट करायला भाग पाडलं.
त्यानंतर हा अश्लील व्हिडिओ कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी देत आरोपीनं त्याच्याकडे दहा हजारांच्या खंडणीची मागणी केली.
मात्र पीडित तरुणाने आरोपीला पैसे देण्यासाठी नकार दिला. त्यावेळी आरोपीने दमदाटी करत तरुणाचा मोबाईल हिसकावला.
त्यावरून गुगल पे आणि फोन पे वरून स्वतःच्या अकाउंट वर पैसे ट्रान्सफर करून घेतले. या सगळ्या नंतर घाबरलेल्या तरुणाने थेट नांदेड सिटी पोलीस ठाणं गाठून या तरुणाविरोधात फिर्याद दिली.
त्यानुसार नांदेड सिटी पोलिसांनी दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला.
WARJE POLICE ROBBERY: वारजे पोलिसांनी दरोडेखोरांना पकडलं रंगेहाथ; व्हिडिओ व्हायरल
या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रॉबीन उर्फ शुभम कांबळे याला अटक करण्यात आली आहे,
तर याप्रकरणातील दुसरा आरोपी ओंकार मंडलिक सध्या फरार असून, त्याचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे. दरम्यान असेच खळबळजनक प्रकार अनेक दिवसांपासून समोर येत आहेत.
त्यामुळे अशा पद्धतीचे डेटिंग ॲप वापरणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे.