पुणेकरांना मिळणाऱ्या चाळीस टक्के कर सवलतीचा शासनादेश जारी

469 0

पुणेकरांना निवासी मिळकत करामध्ये ४० टक्के कर सवलत २०१९ पासून लागू करण्यात यावी तसेच निवासी व बिगरनिवासी मिळकत करामध्ये २०१० पर्यंंत देण्यात येणारी देखभाल दुरूस्तीची वजावट १५ ऐवजी १० टक्के करून यातील फरकाची अर्थात ५ टक्के सवलत चालू आर्थिक वर्षापासून म्हणजेच १ एप्रिल २०२३ पासून लागू करावी. २०१० पासून आकारण्यात आलेली ही ५ टक्के सवलत माफ करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने काढला आहे.

2018 मध्ये तत्कालीन राज्य सरकारनं ही चाळीस टक्के कर सवलत रद्द केली होती त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली होती त्यानंतर बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून आता अखेर हा शासन आदेश जारी झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

Share This News
error: Content is protected !!