GANESHOTSAV PUNE 2025 : अवघ्या काही तासांमध्ये गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात होणार आहे. अशातच गणरायासाठी पुण्यनगरी सुद्धा सज्ज आहे. पुण्यातल्या मानाच्या (GANESHOTSAV PUNE 2025) गणपतींचे तसंच महत्त्वाच्या गणेश मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना कधी होणार पाहूयात…
मनाचा पहिला गणपती ग्रामदैवत पुण्याच्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी स्वामी सवितानंद यांच्या हस्ते होणार आहे.मानाचा दुसरा गणपती (GANESHOTSAV PUNE 2025) तांबडी जोगेश्वरी मंडळाची प्रतिष्ठापना 12 वाजून 15 मिनिटांनी योगश्री शरद शास्त्री जोशी यांच्या हस्ते होणार आहे. पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी होणार आहे. मानाच्या चौथा गणपती तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदी येथील प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या हस्ते होणार आहे. मानाचा पाचवा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या केसरी वाडा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी दहा वाजता रौनक टिळक यांच्या हस्ते होणार आहे.पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी श्री झालरिया पिठाधीश्वर स्वामी घनशामाचार्य महाराज यांच्या हस्ते होणार आहे. पुण्यातील अखिल मंडई गणपतीची प्रतिष्ठापना दुपारी बारा वाजता होणार असून युनिटी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड चे अध्यक्ष नवीन चंद्र मेनकर व स्नेहल मेणकर यांच्या हस्ते होणार आहे. तर पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना दुपारी बारा वाजता अध्यात्मिक आणि प्रेरकवक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार आहे.
मुंबईतल्या किंग सर्कल मधील GSB सेवा गणेशोत्सव मंडळाची प्रतिष्ठापना
राज्यभरातील काही भागांमध्ये उद्या गणेशाचं आगमन होणार असलं तरी मुंबईमध्ये काही सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचं आगमन आधीच (GANESHOTSAV PUNE 2025) झालं आहे. मुंबईतल्या किंग सर्कल मधील GSB सेवा गणेशोत्सव मंडळाची प्रतिष्ठापना मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आली. मुंबईच्या गणेशोत्सवामध्ये किंग सर्कल येथील जीएसबी सेवा गणेशोत्सव मंडळ मागची 71 वर्ष अखंड परंपरा जपत आहे. हा गणेश ‘सुवर्ण गणपती’ आणि महाप्रसाद यासाठी प्रसिद्ध आहे. या गणेशाच्या मूर्तीला सुवर्ण अभूषणांनी सजवण्यात येतं. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपारिक वेशभूषेमध्ये या गणेशाचं स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे या गणेशोत्सवात दरवर्षी करोडो रुपयांचा देखावा, रथ आणि पारंपारिक पूजा विधी होत असतो त्यामुळे त्याला “मुंबईचा राजा” अशीही उपमा दिली जाते. तब्बल 71 वर्षांच्या प्रवासानंतर ही हे गणेशमंडळ श्रद्धा परंपरा आणि वैभवाचा संगम म्हणून गणेश भक्तांच्या मनात स्थान टिकवून आहे.