वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजेच गणेशोत्सवासाठी जवळपास पंधरा दिवस शिल्लक आहेत. त्या अनुषंगाने गणेश मंडळांची लगबग सुरू झाली आहे. चौका चौकात मांडव घालण्याचे डेकोरेशन करण्याचं काम चालू झालं. पुण्यातला गणेशोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असल्याने खूप मोठ्या संख्येने भाविक पुण्यात येत असतात. त्या अनुषंगाने गणेश मंडळांसाठी पुणे पोलिसांकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचं यंदा सात सप्टेंबरला आगमन होणार आहे. तर यंदा दहा दिवसांचा गणेशोत्सव असल्यामुळे 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी अर्थात गणपती बाप्पाचा विसर्जन पार पडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मंडळांच्या संख्येत वाढ झालीये.
आणि गणेशोत्सव म्हटलं की काही समस्या देखील आपोआप तयार होतात. जसे की वाहतूक कोंडी, कर्कश्य आवाजात वाजणारे डीजे, डोळ्यांवर थेट परिणाम करणारे लेझर लाईटस् या सगळ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांनी सर्व गणेश मंडळांसाठी अटी आणि शर्ती असलेली नियमावली जाहीर केली आहे.
काय आहे नियमावली
1. 2022 मध्ये परवानगी घेतलेल्या गणेश मंडळांना 2026 पर्यंत परवानगी लागू असणार आहे त्यामुळे पुन्हा परवानगी घेण्याची गरज नाही.
2. मात्र नवीन गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे आपली नोंदणी करून प्रमाणपत्र घेणे आवश्यक
3. गणेश मंडळांनी आपले मांडव, स्टेज उभे करण्यासाठी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक
4. वाहतूक शाखेच्या परवानगी, वीज जोडणीसाठी, विद्युत निरीक्षकाचे प्रमाणपत्र यासाठी एक खिडकी योजना
5. मांडव उभारण्यासाठी ज्या आकाराची परवानगी घेतली असेल तितक्याच आकाराचे मांडव उभारणे
6. प्रत्येक गणेश मंडळात सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक
7. महिलांबरोबर गैरवर्तन होणार नाही याची याबाबत दक्षता घेणे आवश्यक
8. डीजे/ साऊंड सिस्टिम लावल्यास दोनच स्पीकर लावणे, आवाजाची मर्यादा पाळणे गरजेचे
9. डोळ्यांना इजा करणाऱ्या प्रखर बीम लाइटला मनाई
10. मंडळातील देखाव्यांमुळे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक
11. रात्री 10 पर्यंत कार्यक्रमांना परवानगी
12. मिरवणुकीतील देखाव्यांची उंची जमिनीपासून 14 फुटांपेक्षा कमी आणि रुंदी 10 फुटांपेक्षा कमीच असावी
13. मागील वर्षी प्रमाणे यंदाही मंडळाच्या मिरवणुकीत एका ढोल पथकात 50 ढोल आणि 10 ताशा हीच संख्या असणार
14. एका गणेश मंडळाला मिरवणुकीत जास्तीत जास्त 3 ढोल पथकं लावता येणार
या नियमावलीचा पालन करतच गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करणे गरजेचे आहे. याबरोबरच विसर्जन मिरवणुका संपायला जास्त उशीर होऊ नये, यासाठी सर्व गणेश मंडळांनी एका जागी जास्त वेळ न थांबता आणि दोन मिरवणुकांमध्ये जास्त अंतर न ठेवता मिरवणुका चालू ठेवणं बंधनकारक असणार आहे. पुण्यातील गणेशोत्सव निर्विघ्नपणे पाडण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली असून सर्व गणेश मंडळांनी असं पालन करणार सक्तीचं आहे.
Title
गणेशोत्सव 2024 : गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर
Scroll
यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर
सर्व मंडळांनी नियमांचे पालन करणे गरजेचे
नवीन गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करणे आवश्यक
मांडव, स्टेज उभारण्यासाठी अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक
वीज जोडणीसाठी, विद्युत निरीक्षकाचे प्रमाणपत्र यासाठी एक खिडकी योजना
ज्या आकाराची परवानगी घेतली असेल त्याच आकाराचे मांडव उभारणे
गणेश मंडळात सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक
महिलांबरोबर गैरवर्तन होणार नाही याची याबाबत दक्षता घेणे
डीजे/ साऊंड सिस्टिम लावल्यास दोनच स्पीकर लावणे
स्पीकरच्या आवाजाची मर्यादा पाळणे गरजेचे
डोळ्यांना इजा करणाऱ्या प्रखर बीम लाइटला मनाई
देखाव्यांमुळे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये
Thumbnail
गणेशोत्सव 2024 : गणेश मंडळांसाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर; पाहा काय आहेत नवे नियम