FTII admission controversy: पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या विद्यार्थी संघटनेने सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत अनियमितता असल्याचा गंभीर आरोप केला आहे. (FTII admission controversy) प्रवेश प्रक्रिया त्वरित थांबवली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या संघटनेने दिला आहे. आरक्षण नियमांचे उल्लंघन आणि प्रशासकीय हलगर्जीपणामुळे अनेक उमेदवारांवर अन्याय झाल्याचा दावा विद्यार्थी संघटनेने केला आहे. विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी विकुल शुक्ला, अनुश्रिता चक्रवर्ती, अजमल शाह, अजयराज पी. आणि सौम्यदीप मंडल यांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे एफटीआयआय प्रशासनावर प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित न हाताळल्याचा आणि वारंवार केलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
Infantry Day 2025 Mhow: मऊ येथे ‘इन्फंट्री डे’ २०२५ उत्साहात साजरा; १९४७ च्या वीरांना आदरांजली
विद्यार्थ्यांच्या निवेदनानुसार, १७ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या अंतिम गुणवत्ता यादीत आरक्षण धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या अनेक विसंगती आढळल्या. विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्यावर, प्रशासनाने सुरुवातीला लिपिकीय (FTII admission controversy) त्रुटी झाल्याचे मान्य केले आणि २४ ऑक्टोबर रोजी सुधारित गुणवत्ता यादी जाहीर केली. परंतु, विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, या सुधारित यादीतही गंभीर चुका आहेत. ‘स्क्रीन ॲक्टिंग’ अभ्यासक्रमाच्या जागा १६ वरून वाढवून २३ करण्यात आल्या, मात्र अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) साठी असलेला आरक्षणाचा कोटा विहित मर्यादेपेक्षा कमी करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. हे थेट आरक्षण नियमांचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
Beed Gevrai news: वीज कोसळल्याने एक महिला गंभीर जखमी तर दुसरी बेशुद्ध पडली
प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव
विद्यार्थ्यांनी पुढे आरोप केला आहे की, प्रशासनाने प्रवेश प्रक्रियेच्या दोन्ही टप्प्यातील श्रेणीनिहाय गुण आणि कट-ऑफ यासारखे अत्यावश्यक तपशील जाहीर केले नाहीत. तसेच, जागांची निवड नंतर करण्याऐवजी (FTII admission controversy) प्रक्रिया सुरू करतानाच करण्यास भाग पाडल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, असा आक्षेपही त्यांनी घेतला. निवेदनात म्हटले आहे की, “प्रशासनाने प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखलेली नाही. अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून, एफटीआयआयच्या कार्यप्रणालीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.” प्रशासनाच्या मनमानी कारभारावर विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या गदारोळानंतर, एफटीआयआय प्रशासनाने विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी आज (सोमवार, २७ ऑक्टोबर) एका बैठकीचे आयोजन केले आहे. प्रशासनाने उपस्थित केलेले मुद्दे स्पष्ट करण्याचे आणि संस्थेची भूमिका लवकरच स्पष्ट करण्याचे आश्वासन दिले आहे.
Pune Diwali theft: गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई चोरीचा पर्दाफाश आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त!
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
१. सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया त्वरित थांबवावी .
२. निवड प्रक्रियेच्या दोन्ही टप्प्यांचे निकाल आणि गुण त्वरित जाहीर करावेत.
३. संपूर्ण प्रक्रियेच्या चौकशीसाठी बाह्य चौकशी समितीची नियुक्ती करावी.
४. पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासकीय मंडळात विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश करावा.