पुण्यातील नऱ्हे येथील इमारतीच्या पार्किंगमध्ये आग; 6 गाड्यांचं नुकसान

184 0

पुणे – शनिवारी (ता.17 सप्टेंबर) मध्यरात्री 2 वाजता पुण्यातील नऱ्हे येथील इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागल्याची घटना घडली. संबंधित घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी झाले

आगीमधे 4 दुचाकी व 2 चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. तसेच पार्किंगच्या वरिल सिलिंगचा काही भागाला आगीची झळ लागल्याचे दिसून आले. सदर इमारत ही तळमजला अधिक सहा मजले अशी असून आग लागल्याचे कारण समजू शकले नाही.

Share This News
error: Content is protected !!