पुण्यात कोंढवा भागात फर्निचर गोदामाला भीषण आग

534 0

पुणे- कोंढवा भागातील एका फर्निचर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

पुण्यातील कोंढवा भागातील पारगेनगर या ठिकाणी असलेल्या एका फर्निचरच्या गोदामाला दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण फर्निचरचं गोदाम खाक झाले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नऊ ते दहा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर आग आटोक्यात आली.

या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात फर्निचर तसेच फर्निचर बनवणाऱ्या मशीन ठेवण्यात आल्या आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Share This News
error: Content is protected !!