पुण्यायातील विश्रांतवाडी येथील आरटीओ ऑफीसला आग

675 0

विश्रांतवाडी फुलेनगर येथील आरटीओ कार्यालयाच्या आवारामधे जप जप्त केलेली दहा वाहने मकर संक्रातीच्याच दिवशी जळून खाक झाली आहेत. कार्यालयाला रविवारमुळे आणि मकर संक्रातीमुळे सुट्टी होती. त्यामुळे आग लागल्याचे कारण अद्यापपर्यंत समजले नाही.

विश्रांतवाडी, फुलेनगर आरटीओ  कार्यालयाच्या आवारात जप्त केलेल्या वाहनांना आज (रविवार) दुपारी भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत पाण्याचा फवारा मारुन आग विझवली. या दुर्घटनेत 4 कार, 4 लक्झरी बस,1 टेम्पो व एक डंपर अशी एकूण 10 वाहने जळून खाक झाले आहेत. ही दुर्घटना दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली.

Share This News
error: Content is protected !!