अखेर चांदणी चौकातील पूल इतिहासजमा

384 0

पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी पाडण्यासाठी ६०० किलो  स्फोटकांच्या माध्यमातून पूल प्रयत्न केला होता मात्र ब्लास्टनंतर ही पूल न पडल्याने आता  पाडकाम पोकलेनच्या सहायाने पडण्याचे काम सुरू झाले होते.

अखेर 2 वाजून 33 मिनिटांनी चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त करण्यात प्रशासनाला यश आलं असून सकाळी 8 वाजेपर्यंत परिसरातील वाहतूक सुरळीत करणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

1993 मध्ये या पुलाचं बांधकाम करण्यात आलं असून आता वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचा कारण देत हा पूल जमीन दोस्त करण्यात आला असून लवकरच या ठिकाणी नवा नऊपदरी पूल उभारण्यात येणार आहे

 

Share This News
error: Content is protected !!