Pune News

Pune News : गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने पुणे विद्यापीठाच्या आवारात जोरदार राडा

437 0

पुणे : गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने तिघांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune News) आवारातील सेवक वसाहतीमध्ये घडली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दिनेश वाल्मिकी (वय 30), प्रतिक मल्हारी (वय 23, रा. दोघे रा. विद्यापीठ सेवक वसाहत), उमेश (वय 25, रा. चिखलवाडी, ओैंध) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.या राड्याप्रकरणी कृष्णा किशोर तांबोळी (वय 35, रा. विद्यापीठ सेवक वसाहत) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काय घडले नेमके?
तांबोळी आणि आरोपी वाल्मिकी, मल्हारी विद्यापीठाच्या आवारातील चाळीत राहतात. गणेश उत्सव 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. या साठी विद्यापीठात सेवक चाळीत तयारी सुरू आहे. या साठी वर्गणी गोळा करण्याचे देखील काम सुरू आहे. दरम्यान, वाल्मिकी आणि मल्हारी यांनी तांबोळी यांच्याकडे गणेशोत्सवासाठी वर्गणीची मागणी केली. मात्र, तांबोळी यांनी वर्गणी देण्यास नकार दिला. सेवक वसाहतीतील मोठ्या मंडळाला वर्गणी दिली असल्याचे तांबोळी यांनी सांगितले.

याचा राग आल्याने आरोपी आणि फिर्यादी यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर हा वाद वाढत गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. वाल्मिकी, मल्हारी आणि साथीदारांनी तांबोळींना बांबूने बेदम मारहाण केली. यात तांबोळी हे जखमी झाले. पोलीस नाईक रायकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Dhule Bus Accident

Bike Accident : दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Posted by - April 16, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक (Bike Accident) बातमी समोर आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या वरठाण…

ब्रेकिंग ! पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Posted by - March 24, 2022 0
पुणे शहरातील शिवाजीनगर परीसरात  असलेल्या एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची  घटना समोर आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली होती.…
Shri Tambadi Jogeshwari Ganpati

गणपती बाप्पा मोरया ! श्री तांबडी जोगेश्वरी गणपती आगमन सोहळा पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन…

मोठी बातमी : रिक्षा संघटनांचे आंदोलन अस्त्र मागे; आज घेणार राज ठाकरेंची भेट

Posted by - November 29, 2022 0
पुणे : बेकायदेशीर बाईक आणि टॅक्सीच्या विरोधात सोमवारी रिक्षा संघटनांनी मोठे आंदोलन उभे केले. हे आंदोलन मागे घेण्यात आले असून,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *