पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 5 महिलांचा जागीच मृत्यू

597 0

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण  अपघात झाला असून यामध्ये 5 महिलांचा जागीच मृत्यू, झाला आहे. तर 13 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या महिला पुणे शहरातून खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी जात होत्या. रात्रीच्या सुमारास या महिला येत होत्या. त्यावेळी पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनवर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कारने या महिलांना रस्ता ओलांडताना जोरदार धडक दिली.

जखमी महिलावर खाजगी आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. फरार वाहन चालकाचा खेड पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!