पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाऊंट

1001 0

पुणे शहरात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आता तर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना या सायबर चोरीचा फटका बसला आहे. सायबर चोरट्यांनी ‘माही वर्मा’ या नावाने हे बनावट अकाऊंट तयार केलं होतं. या अकाऊंटवरून जिल्हाधिकारी देशमुख यांचे फोटो देखील पोस्ट करण्यात आले होते. तसेच देशमुख यांच्या मूळ अकाऊंटवरील काहींना रिक्वेस्टही पाठवण्यात आल्या होत्या. सायबर चोरट्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट बनवल्यामुळे खळबळ उडाली आहे

Share This News
error: Content is protected !!