गणेश जयंती निमित्त पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेशजन्म सोहळा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मंदिर परिसराला आकर्षक आरास आणि विद्युतरोषणाई कऱण्यात आली आहे.मंदिरात पाहटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं अयोजन करण्यात आलं होत. पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक कारण्यात आला. तर पहाटे 4 ते 6 या वेळेत स्वराभिषेक कार्यक्रम झाला.सुप्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वे यांनी हा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर सकाळी सहा ते अकरा आणि दुपारी दीड ते सायंकाळी सहा या वेळेत गणपती सुप्त अभिषेक होणार आहे. सकाळी आठ ते साडेअकरा आणि त्यानंतर दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत गणेशयाग होणार असून बारा वाजता गणेशजन्म सोहळा संपन्न होईल. सायंकाळी सहा वाजता नगर प्रदक्षिणा मिरवणूक निघेल. रात्री साडेआठ वाजता श्रींची महाआरती होईल आणि रात्री दहा ते पहाटे तीन वाजेपर्यंत श्री गणेश जागर करण्यात येणार आहे.
