EXCISE DUTY ACTION ILLIGAL ALCOHOL: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री, तस्करीच्या घटना समोर येत आहेत.
त्यातच आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने (EXCISE DUTY) तब्बल सव्वा कोटींची दारू जप्त करत एका आरोपीला अटकही केली आहे.
VIDEO: गोव्यातून तस्करीसाठी आणलेला अवैध मद्यसाठा पुण्यात जप्त
गोव्यातून तस्करी करुन आणण्यात आलेल्या अवैध मद्य साठ्यावर ही कारवाई करण्यात आली.
यात तब्बल 1 कोटी 15 लाखांच्या 57 हजार 792 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
एका सहाचाकी कंटेनरमध्ये मोठमोठ्या बॉक्समधून या बाटल्या नेण्यात येत होत्या.
यूपीएससीच्या निकालात मुलींचा डंका; श्रुती शर्मा भारतातून पहिली
याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली.
त्यामुळे विभागाने अगदी शिताफीने हा कंटेनर ताब्यात घेऊन जप्त केला. व तपासणी केला असता कंटेनरमध्ये गोव्यातील अवैध मद्याचा साठा आढळला.
दरम्यान त्यावर त्वरीत कारवाई करण्यात आली. जेजुरी सासवड रोडवरील वीर फाटा येथे ही कारवाई करण्यात आली.
LIQUOR PRICE HIKE: दारू महागणार! सरकारला 14 हजार कोटींचा बोनस, तळीरामांच्या खिशाला झटका!
यामध्ये 1 कंटेनर, मोबाईल आणि दारुसाठा असा 1 कोटी 33 लाख 79 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
WHO IS YASHASHREE MUNDE : वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीनिमित्ताने यशश्री मुंडेंची राजकारणात एंट्री