ऐतिहासिक स्मारकांची स्वच्छता व देखभालीसाठी उद्योजक पुनीत बालन यांचा पुढाकार

120 0

पुणे:समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले युवा उद्योजक पुनीत बालन यांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारकांची स्वच्छता आणि देखभाल करण्याची जबाबदारी घेतली आहे. इंद्राणी बालन फाउंडेशन आणि राज्य पुरातत्त्व विभाग यांच्यात यासंबंधीचा करार नुकताच झाला.

पुणे जिल्हयातील सिंहगड किल्यावरील छत्रपती राजाराम महाराज समाधी, वढू बुद्रुक येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ, राजगुरुनगर मधील हुतात्मा शिवराम हरी राजगुरुंचे जन्मस्थळ आणि तुळापूर येथील महादेव मंदिर या राज्य संरक्षित स्मारकांचा यामध्ये समावेश आहे. यासर्व ठिकाणी वर्षभर हजारो पर्यटक भेट देत असतात. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही संख्या अनेक पटीने वाढलेली असते. या स्थळांविषयी देशातील नागरिकांच्या मनात एक आस्थेची आणि स्वाभिमानाची भावना आहे. या ठिकाणांची देखभाल होणे आवश्यक असल्याने या स्मारकाची दैनदिन स्वच्छता आणि देखभाल करण्याची तयारी उद्योजक पुनीत बालन यांनी राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांच्याकडे पत्राद्वारे दर्शविली होती. पुरातत्व विभागाने त्यास तत्काळ परवानगी दिली. त्यानुसार यासर्व स्मारकांच्या ठिकाणी सामाजिक संस्था दायित्व योजनेअंतर्गत इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून सात सुरक्षा रक्षक कर्मचारी नेमण्यात येणार आहे. तसेच या स्मारकाच्या लगतच्या परिसराची दैनदिन स्वच्छता, देखभाल व परीक्षण फाउंडेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे.

याबाबत बोलताना पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. वाहणे म्हणाले, “‘सामाजिक संस्था दायित्व योजने’अंतर्गत चार संरक्षित स्मारकांचे देखभालीचे दायित्व ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या वतीने शिवप्रेमी तथा युवा उद्योजक पुनीत बालन यांनी स्वीकारले, त्यांचे कौतुक आणि स्वागत आहे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेली राज्य संरक्षित स्मारकाच्या दैनंदिन देखभालीसाठी लोकसहभाग वाढत आहे, ही खुप स्तुत्य बाब आहे. यामुळे स्मारकांची स्वच्छता राखणे व देखभाल करण्यास मदत होईल. आपला वारसा जपण्यासाठी इतरांनीही पुढाकार घ्यायला हवा.

महाराष्ट्राला महापुरुषांचा मोठा वारसा लाभला आहे. त्यांची स्मारके ही नेहमीच नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असतात. पुणे शहर आणि परिसरात महापुरुषांची अनेक स्मारके आणि धार्मिक स्थळं आहेत. त्यांची व्यवस्थित देखभाल व तिथं स्वच्छता राखणं आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि स्मारकांचे पावित्र जपले जावे या भावनेतून सामाजिक दायित्व योजनेतून त्यांच्या सुरक्षिततेची आणि स्वच्छतेची जबाबदारी स्वेच्छेने स्विकारली आहे. असं युवा उद्योजक पुनीत बालन यांनी सांगितलं

Share This News

Related Post

Pune News

Acharya Atre : आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दीत्तोतर रौप्य महोत्सवी वर्ष पुणे महानगरपालिकेने साजरे करावे

Posted by - July 27, 2023 0
पुणे : साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या (Acharya Atre) जन्मशताब्दीतोत्तर जन्म रौप्य महोत्सवी वर्ष यंदा 13ऑगस्ट रोजी सुरु होत आहे.त्या…
jitendra shinde

Pune News : कोपर्डी हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या

Posted by - September 10, 2023 0
पुणे : अहमदनगरच्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने पुण्यातील (Pune News) येरवडा कारागृहात गळफास घेऊन…

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात ‘पोटरा’ ठरला उत्कृष्ट मराठी चित्रपट

Posted by - March 13, 2022 0
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (पिफ २०२२) उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार तुर्कस्तानचा चित्रपट ’बिट्वीन टू डॉन्स’ या चित्रपटाला, तर उत्कृष्ट मराठी…

#PUNE : MPSC परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार साल 2023 पासूनच घ्या ! MPSC च्या विद्यार्थ्यांची आता अशी मागणी , वाचा सविस्तर

Posted by - February 3, 2023 0
पुणे : पुण्यात आज एमपीएससी करणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. नवीन वर्णनात्मक अभ्यासक्रम 2023 पासूनच लागू करावा, या मागणीसाठी आज…

ठोस पुराव्याच्या अभावी कुख्यात गुंड गजा मारणेला जामीन

Posted by - April 4, 2023 0
व्यावसायिकाकडे वीस कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *