पुणे- शहरातील नामांकित राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेमध्ये (NARI ) नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प तांत्रिक अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 असणार आहे.
या पदासाठी भरती
प्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) – एकूण जागा 01
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मास्टर इन सोशल वर्क पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे.
अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांना सोशल वर्कचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वेतन-
या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 32,000/- रुपये प्रतिमहिना पगार देण्यात येणार आहे.
अर्जासोबत ही कागदपत्रे आवश्यक-
बायोडेटा
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2022