दारू पिऊन गाडी चालवतात ? थांबा, नाहीतर लायसन्स होईल रद्द 

2219 0

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात अपघातांची मालिका सुरू आहे. त्याचबरोबर मद्य, अमली पदार्थ यांच्या विरोधातील मोहीमाही चालू आहेत. बराच वेळा मद्य आणि अमली पदार्थ अपघातांचे कारण ठरत आहेत. त्यामुळे आता अशा मद्यपी वाहन चालकांवर वचक ठेवण्यासाठी नवा नियम लागू होऊ शकतो. तो म्हणजे दारू पिऊन गाडी चालवताना आढळल्यास थेट तुमचे लायसन्स रद्द होऊ शकते.

पुण्यातील वाढते अपघात आणि हिट अँड रन च्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अपघातामध्ये बराच वेळा चालकाने मद्य सेवन केल्याचे आढळून येत आहे. म्हणूनच अशा प्रकारे मद्य सेवन करून गाडी चालवताना आढळल्यास थेट ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे, यावरचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी न्यायालयाकडे पाठवला आहे. त्यामुळे जर या प्रस्तावाला न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला तर हा कडक नियम पुणे शहरात लागू होईल. त्यामुळे कदाचित वाढत्या अपघातांना रोखण्यात पुणे पोलिसांना यश येईल‌. त्यामुळे आता या प्रस्तावावर न्यायालय कोणती भूमिका घेणार याकडे कोणी पोलिसांचे लक्ष लागले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!