पुणे- पुणे रेल्वे स्टेशन परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने मोठा ड्रग्स साठा जप्तकेला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ११ लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.
महंमद फारूख उमर टाक असे या आरोपीचे नाव आहे. रेल्वे स्टेशन परिसरात मालधक्का चौक रस्त्यावर ड्रग्ज घेऊन एकजण येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून महंमद टाकला अटक केली.
त्याच्याकडून 11 लाख 80 हजार रुपयांचे 118 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ जप्त कले आहे. महंमद टाक हा आरोपी अंधेरी पश्चिम येथील म्हाडा कॉलनी येथे राहत होता. त्याच्याकडून मोबाईल, डिजिटल वजन काटा, 2 हजार 590 रुपयांची रोकड, आधारकार्ड, डेबिट कार्ड हा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणाचा पुढील अधिक तपास विश्वास भास्कर करत आहेत.