प्रारुप मतदार याद्या राष्ट्रवादीच्या दबावाखाली- जगदीश मुळीक

274 0

आगामी निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्या महापालिका प्रशासनाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला.
प्रारुप मतदार यादीतील त्रुटी आणि घोळांबाबत मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. महापालिका निवडणुकीच्या मतदार याद्या तपासणीसाठी आणि दुरुस्तीसाठी मुदतवाढ मिळावी, मतदार याद्यांमधील त्रुटी दूर कराव्यात अशा मागण्या केल्या. अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल. असा इशारा दिला.
मुळीक म्हणाले, महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी महापालिका प्रशासनाने दिनांक 23 जून 2022 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ती करताना एका प्रभागातील मतदार दुसर्‍या प्रभागात टाकणे काही याद्या गायब होणे, असे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. महापालिका हद्दी बाहेरील गावातील मतदारांचा पुणे महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मतदार याद्या बीएलओ कडून करून घेणे अपेक्षित असताना संबंध नसलेल्या लोकांकडून मतदार याद्या फोडल्या गेल्याने त्यात चुका झाल्या आहेत. विविध प्रभागांमधील चार ते पाच आणि दहा ते पंधरा मतदार याद्या दुसर्‍या प्रभागात जोडल्या गेल्या आहेत. 58 प्रभागांपैकी 17 प्रभागात लोकसंख्या कमी आणि मतदार संख्या जास्त असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे प्रमाण जवळपास 30 टक्के इतके आहे.

यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, वर्षा तापकीर,मा सभागृह नेते गणेश बिडकर, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येंनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे, सुशिल मेंगडे, प्रशांत हरसूले, मा.नगरसेवक योगेश मुळीक, मंजुषा नागपुरे, छाया मारणे, जयंत भावे, मंजुश्री खर्डेकर, राहूल भंडारे, सुनिता वाडेकर, गणेश कळमकर, तुषार पाटील, महेश गलांडे, पूनित जोशी, साचीन मोरे, महेश पुंडे, अनिता तलाठी, चंद्रकांत जंजिरे, सुनिल खांदवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Share This News

Related Post

पुणे : विमाननगर परिसरात झाडपडीच्या घटनेत चारचाकी वाहनाचे नुकसान

Posted by - August 5, 2022 0
पुणे : अनेक दिवस पावसानं दडी मारल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे . अनेक ठिकाणी…

चांदणी चौक पाडण्याचेवेळी मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुणे शहरातील वाहतूक रहाणार बंद ; वाचा वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग

Posted by - September 28, 2022 0
पुणे : मुंबई- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल येत्या १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. हा…

PUNE CRIME : सराईत गुन्हेगार योगेश नागपुरे आणि टोळक्यातील सहा साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - December 3, 2022 0
पुणे : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आत्तापर्यंत अनेक गुन्हेगार आणि टोळक्यांवर जबरदस्त कारवाईचा बडगा उभारला आहे. मुंडवा पोलीस स्टेशनच्या…

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक (व्हिडिओ)

Posted by - January 29, 2022 0
पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने…

प्रसिद्ध एकपात्री कलाकार वंदन नगरकर यांचे निधन

Posted by - March 22, 2023 0
पुणे : प्रसिद्ध एकपात्री कलाकार आणि व्यक्तिमत्व विकास तज्ञ वंदन नगरकर यांचे मंगळवारी निधन झाले फुफुसांच्या कर्करोगाने ते त्रस्त होते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *