DR NEELAM GORHE: मनुष्य जातीच्या चंगळवाद आणि भोगवादी वृत्तीमुळे निसर्गाचे आजवर बरेच नुकसान झाले आहे.
मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई याचे झाळे वाढणे आवश्यक आहे असे मत उपसभापती डॉ .नीलम गोऱ्हे DR NEELAM GORHE: यांनी व्यक्त केले .
ग्रीन हिल्स ग्रुप या संस्थेतर्फे देवराई फाउंडेशन,सहयाद्री देवराई,वनाई नैसर्गिक शेती फार्म आणि कृषी पर्यटन केंद्र
या संस्थांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “देवराई” संकल्पनेवर आधारितप्रदर्शन आणि प्रकल्पांचे बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले आहे.
त्या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.
त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी.,पुण्याचे उपवनसरंक्षक महादेव मोहिते, जेहलम ताई जोशी,पर्यावरण संवर्धन अधीक्षक मंगेश दिघे,ग्रीन हिल्स ग्रुपचे प्रमुख अतुल वाघ,देवराई फाउंडेशनचे रघुनाथ ढोले,भूजल विज्ञान शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे,देववन संकल्पनेचे किशोर मोहोळकर आणि वनाई नैसर्गिक शेती फार्म व कृषी पर्यटन केंद्राचे सहसंचालक अथर्व वेताळ सहयाद्री देवराईच्या स्मिता जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,येत्या कालावधीत आपल्या सर्वांना रिफ्युज,रियुज , रिड्युस,रिसायकल आणि रिथिंक या पाच ” आर ” वर काम करावे लागणार आहे.किल्ले आणि दुर्ग संवर्धनासाठी राज्यसरकारने 3 टक्के निधी मंजूर केला आहे.
या निधीच्या माध्यमातून पर्यावरणाच्या दृष्टीने अधिकधिक काम करण्याची गरज आहे.
त्याच बरोबर आपण सर्वानीच वनविभागाच्या ज्या जागा आहेत. त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन काम केले पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
Nilam gorhe| ऑनलाइन नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा,जनजागृती करा