पुणे: खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्ग वाढवून तो आज सकाळी 10 वाजता 3424 क्युसेक करण्यात आला आहे.
त्यामुळं नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात आलं आहे.
सोमवारी रात्री 12 वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यातून 856 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या चारही धरणांत पावसानं दमदार हजेरी लावली असल्यानं धरणांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे.