पुणे : भारतीय जनता पार्टी ने मध्यप्रदेश, राजस्थान, तसेच छत्तीसगड मध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्या नंतर भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी बोलताना घाटे म्हणाले ,’ पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वावर जगाने शिक्कामोर्तब केले आहे. केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकार हे जनतेचे सरकार आहे तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी आहे’. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.
यावेळी घाटे यांच्यासह पुणे भाजपा प्रभारी माधवजी भांडारी, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सचिव वर्षा डहाळे,युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी ,वर्षा तापकीर, रवींद्र साळेगावकर,राहुल भंडारे,उपाध्यक्ष प्रमोद कोंढरे,प्रिया शेंडगे, गायत्री खडके,राजेंद्र काकडे,गणेश बगाडे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
मध्यप्रदेश, राजस्थानात काँटे की टक्कर; कल हाती यायला सुरुवात
Telangana Election Result : महाराष्ट्र जिंकायला निघालेल्या ‘राव’ यांच्यावर तेलंगणा गमावण्याची वेळ?
Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला